परंडा/ प्रतिनिधी -
कोरोना व्हायरस चा संसर्ग रोखन्या साठी येथील तालुका आरोग्य विभागा कडून खबरदारी चा उपाय म्हणुन स्वतंत्र कक्षाची स्थापणा करण्यात आली आसुन विदेशातुन परतलेल्या तालूक्यातील वागेगव्हाण व सोनगीरी येथिल एक असे दोन नागरीकांची वैद्यकीय तपासणी साठी दि.२३ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणण्यात आले आहे.त्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालूका अरोग्य अधिकारी डॉ.सय्यद यांनी दिली.
पुणे,मुंबई येथे कोरोना व्हायरसचा संसंर्ग वाढत असल्याने नागरीकांचा लोंढा गावाकडे येत असुन परंडा तालूक्यात ८ हजार नागरीक विवीध शहरातुन आल्याची नोंद तालुका आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात शहरातुन येणाऱ्या नागरीकांवर आरोग्य विभागाची करडी नजर असुन बाहेरून आलेल्या नागरिकांची कार्यकर्त्याकडून शहरातुन आलेल्या नागरीकांची माहिती घेऊन नोंदी घेण्यात येत आहे.तसेच त्यांच्यापासून कुटूंबाना लांब राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 
Top