तुळजापूर/प्रतिनिधी
-
कोरोना
संसर्गाने सर्वञ हाहाकार
माजवला असुन अशा परिस्थितीत
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात
पिकवलेली टमाटे,
कोंथीबर,
बटाटे,
ककडी,
द्राक्ष,
खायची
पाने,
कलिंगडी,
खरबुज,
पपई
या बरोबरच पालेभाज्या
मार्केट बंद असल्याने व
व्यापाऱ्यांकडून मालाची
खरेदी होत नसल्यामुळे शेतकरण्याचे
लाखो रुपयाचे नुकसान होत
आहे.तसेच
शेतातील फळबागा व भाजापाला
याचे करायाचे काय असा प्रश्न
त्यास पडला आहे.
शेतातील
उत्पादीत माल बाजार पेठेत
विकला न गेल्यास तो खराब होणार
आहे,
त्यामुळे
शेतकऱ्यांना कपाळाला आट्या
पडल्याचे चित्र पहावयास मिळत
आहे.
अवकाळी
पाऊस , दुष्काळी
संकटातुन नुकताच बाहेर पडत
असताना कोरोना
संकट शेतकऱ्यांन समोर आ वासुन
उभे आहे.
त्यामुळे
शेतकरी चिंताग्रस्त
झाला
आहे.
दुष्काळातुन
वाचल्यावर चार पैसे मिळतील
या आशेने मोठ्या प्रामाणात
अनेक फळ व भाज्याची
लागवड तिर्थक्षेञ तुळजापूरचा
पंचक्रोषीत असणाऱ्या काक्रंबा,
आपसिंगा,
तडवळा,
मोर्डा,
सिंदफळ,
काञी,
कामठा
आदी
भागात मोठ्या प्रमाणात झाली
आहे.
द्राक्ष
काढणी चालु झाली
आहे,
तसेच
टमाटो,कोथीबीर
प्लॉट काढणीस
आले आहेत.
मात्र
कोरोना
पार्श्वभूमीवर चाळीस रुपये
किलोन ठोक विकणा-या
द्राक्षांना वीस रुपयाने
घेण्यास हैद्राबाद,
सोलापूर
सह अन्य व्यापारी तयार नाहीत.
बाजार
पेठ बंद असल्याने व्यापारी
वर्गाने इकडे येणेच बंद केले
आहे. पान
टप-या
व शुभविवाह कार्यक्रम बंद
झाल्याने खायाचे पाने विकायाचे
कुणाला असा प्रश्न शेतकऱ्यासमोर
पडला
आहे.