उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभुम उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आदर्श निर्णय घेत आमदारांना मिळणारे एक महिन्याचे वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे जाहीर केलं आहे. यावेळी कैलास पाटील यांनी घर पोच किराणा करण्यास प्रवानगी द्या, शेतात रहण्यास गेलेल्या लोकाना लाईट उपलब्ध करुन द्या , शेतकऱ्यांना डायरेक्ट माल विकण्यास पुणे- मुबंईसह सर्वञ परवानगी द्या अशी मागणी आरडीसी चीे भेट घेऊन केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यातील आमदारांना दरमहा जवळपास दोन लाख रुपये मानधन मिळते, राज्यातील आमदार उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचे अनुकरण करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
