उमरगा /प्रतिनिधी-
प्राचीन काळी जगभरात बौद्ध धम्म झपाट्याने वाढला होता.जगातील अनेक  देशात मोठ्या प्रमाणात पूर्वी बौद्ध धम्म होता भारतातही तो होता सम्राट अशोक राजांनी बुद्ध धम्माला वाढविण्याचे काम केले व नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माचे पुनर्जीवन केले,स्वत:ला दलित म्हणून घेतल्यामुळे बौद्ध धम्म देशात नगण्य राहिला आहे. शांती व समतेसाठी बौद्ध धम्म गतिमान करा, असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज (पणतू) राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील येणेंगुर  येथे  शनिवारी दि .14 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धम्म परिषदेत  बाजार मैदाना वरील भव्य सभेला संबोधित करीत असताना आंबेडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे (लातूर) उपस्थित होते या वेळी भिखु भदंत नागसेन बोधी उदगीर,भदंत महाथेरो सोलापूर,भदंत नागसेन खरोसा ,भदंत धम्मसार कराळी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. अस्मिता कांबळे, प्रा. सुरेश बिराजदार अजित गायकवाड सोलापूर,रफिक तांबोळी,दिग्विजय शिंदे, अभिमन्यू गायकवाड पुणे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, सुभाष सोनकांबळे, दत्तात्रय बनसोडे, शिरीष बनसोडे,प्रा डॉ संजय कांबळे,प्रा किरण सगर ,नगरसेवक ललिता सरपे,पं स सदस्य सुवर्णताई भालेराव,सरपंच सौ सुनंदाताई माळी, चद्रकांत कांबळे आदी उपस्थित होती
 या वेळी राजरत्न आंबेडकर, भिक्षु  संघाचे फुलांचा वर्षाव करून मुली व महिलांनी स्वागत केले यावेळी सभामंडपतील वातावरण भारावून गेले होते. जगात दु:ख आहे तृष्णा त्याचे कारण आहे व आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे हा त्यावरचा उपाय आहे हेच धम्माचे तत्वज्ञान आहे हे सार सांगून समतेवर व विज्ञानाव आधारलेला मानव धर्म जर कोणता असेल तर तो बुद्ध धम्म आहे म्हणून जागतिक शांततेसाठी व कल्याणासाठी बुद्ध धम्माची आवश्यकता असल्याचे, मत प्रमुख धम्मदेसनेमध्ये सोलापूर,उदगीर,खरोसा,कराळी आदी ठिकाणावरून आलेल्या भिखुनी व्यक्त केले.  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. शरद गायकवाड, आभार सुभाष गायकवाड यांनी मानाले,कार्यक्रमास तालुक्यातील बौद्ध  हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल बनसोडे, नितीन गायकवाड, सतीश गायकवाड, आनंद गायकवाड, चंदू कांबळे, तानाजी कांबळे, श्रीकांत साखरे, शिवाजी गायकवाड, अतुल सुरवसे, दादा कांबळे, सागर बनसोडे आदींनी परिश्रम घेतले .

 
Top