तुळजापूर/प्रतिनिधी-
कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचा पाश्र्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर येथे देवीदर्शनार्थ देशभरातुन भाविक येत असल्याने त्याचा व शहरवासियांच्या सुरक्षेसाठी शहरातील  उपजिल्हा रुग्णालयात  "कोरोना वार्ड"चे निर्माण केले आहे. या वार्ड मध्ये एकुण १० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
परंतु आजपर्यत एकही करोनाचा संशियत रुग्ण आढळला नसल्याची माहीती उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान  सर्दी, खोकल्याचे रुग्ण येताच त्याची अधिक दक्षतेने तपासणी करून तो रूग्ण  कुठुन आला आहे याची सखोल चौकशी केली जात आहे. करोना संशीयत रुग्ण आढळल्यास त्याचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले जाणार असुन त्याच्यावर येथेच उपचार केले जाणर आहेत. कोरोना बांधीत रुग्ण चोवीस तास डाँकटरचा निगराणी खाली असणार आहेत. यासाठी  वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण रोचकरी, डॉक्टर शिर्शिकर,डॉक्टर कुतवळ, डॉक्टर बिराजदार मॅडम तसेच सिस्टर व कंपाउंडर परिश्रम घेत आहेत.

 
Top