वाशी /प्रतिनिधी-
वाशी तालुक्यात कोरोना आजारास प्रतिबंध आणि उपाययोजना करण्यात संदर्भात दि. 12 मार्च रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी, कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करावयाच्या आहेत या संदर्भात विस्तापुर्ण चर्चा करण्यात आली. तसेच प्राथमिक केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधा व कोरोना बाधित संशयित रूग्ण आढळल्यास त्या  रूग्णावर कशा प्रकारे उपचार करावयाचे आहेत या संदर्भात आढावा घेण्यात आला.
सदर बैठक निवासी नायब तहसीलदार श्रीमती सुजाता हंकारे यांनी ग्रामीण रुग्णालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे वाशी तालुका अध्यक्ष, केमिस्ट आणि ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, नगर परिषदचे कर्मचारी, डॉ.तेजस काळे,डॉ.महिंद्रकर डॉ.चेतन चेडे , सचिन पवार, राहुल कवडे, अविनाश शिंदे , गोपीनाथ घुले आदींची उपस्थिती होती.

 
Top