उस्मानाबाद / प्रतिनिधी-वि त्तीय वर्ष 2019-2020 या वर्षाचे रक्कमाचे सर्व व्यवहार दि.31 मार्च 2020 रोजी पुर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये व जनता यांना शासकीय रक्कमांचा बॅकेत भरणा करणे व बॅकेतुन रक्कमा काढणे कामी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्र.409 अन्वये उस्मानाबाद
जिल्हयातील शासकीय रक्कमेची देवाण-घेवाणीचा व्यवहार करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅका या दि.31 मार्च 2020 वार मंगळवार रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.