
लोहारा तालुक्यातील फणेपुर येथील पती व पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फणेपुर येथील छगुबाई गोपीचंद माळी (72) यांचा दि.13 मार्च रोजी सांयकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केल्यानंतर त्यांचे पती गोपीचंद आप्पाराव माळी (78 ) यांचे दि.14 मार्च रोजी दुपारी साडे चार वाजायच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याणे निधन झाले. यांच्या अंतविधीस परिसरातील नागरीक, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यांच्या पाश्चात 3 मुले व 2 मुली असा परिवार आहे.