उस्मानाबाद/प्रतिनिधी-
या कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात सायबर सुरक्षेविषयी अनेक महत्वाच्या विषयांची माहिती अत्यंत साध्या सोप्या भाषेत देण्यात आली आहे. या पुस्तकाचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले असून संकलन व संशोधन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद  येथील माहिती तंत्रज्ञान विषयाचे विषय सहायक तानाजी खंडागळे यांनी केले आहे.
या उपक्रमास प्रमुख मार्गदर्शन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, प्राचार्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे विकास गरड, माहिती व जनसंपर्क विभाग औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ,शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील आयटी विभाग प्रमुख डॉ.प्रभाकर बुधाराम यांनी केले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन सभागृहातील उपस्थित सर्वांचे मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ.मीना जिंतूरकर यांनी कार्यशाळेचा उददेश सर्वांसमोर विषद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर आभार डॉ. कौशाली राजगुरू यांनी मानले. कार्यशाळेचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने व उपस्थित सर्वांचे सायलेंट मोडवरील मोबाईल नॉर्मल मोडवर आणून करण्यात आला.
या कार्यशाळेस जिल्हयातील विविध भागातील युवक-युवती, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, वुमन डॉक्टर विंगच्या महिला डॉक्टरर्स सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, डाएटमधील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, नागरिक, पत्रकार यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
 
Top