संवाददाता । उमरगा
माहेश्वरी संघटनेच्या वतीने श्रमजीवी महाविद्यालयाच्या पाठीमागे साई कॉलनी येथे पाल मारून राहणारे व  जडीबुटी चा व्यवसाय करणारे अनेक परिवार  लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा गरीब परिवारांना माहेश्वरी संघटनेच्या वतीने भोजन देण्यात आले.
यावेळी  माहेश्वरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद चांडक, तालुका अध्यक्ष शिवप्रसाद लड्डा, तालुका सचिव मनिष सोनी, शहर अध्यक्ष दिपक लाहोटी, लक्ष्मीकांत सोमाणी, राजीव मुनोत, शितल लड्डा, जुगलसेठ खेंडेलवाल, रामेश्वर सोमाणी, किशोर काबरा, अक्षय तोतला, प्रशांत स्वामी आदींने प्रयत्न केले.

 
Top