उमरगा/प्रतिनिधी-तालुक्यातील जकेकूर व परिसरात काही दिवसांपासून आयडिया , एअरटेल, जीओ आदी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कबाबत समस्या निर्माण होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. एकीकडे मोबाईल कंपन्यांनी सेवांचे दर वाढवले आहेत . त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. प्रत्येक कंपनीचा महिन्यासाठी सरासरी अडीचशे रुपयाचा रिचार्ज मारावा लागतो त्याबदल्यात प्रती दिवस दिड जीबी पर्यंतचा डेटा दिला जातो .
कोरोनामुळे राज्यासह देश लॉक डाऊन आहे . नागरीक आपापल्या घरीच आहेत . त्यामुळे नातेवाईक व मित्रमंडळीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल , तसेच व्हिडीओ कॉल करणेसाठी इंटरनेटची आवश्यकता भासत आहे मात्र हि सेवा मोबाईल कंपन्याकडून मिळत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत .
सोशल मिडीया जसे फेसबुक , वॉट्सअॅप , युट्युब इन्स्टाग्राम , टेलिग्राम आदी माध्यमाचा वापर ग्राहक मोठया प्रमाणात करतात . याच्या माध्यमातुन डिजीटल स्वरूपातील घटना, बातम्या कळत असतात . मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .
गेल्या चार दिवसांपासून जवळजवळ सर्वच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कबाबत समस्या निर्माण होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. एकीकडे मोबाईल सेवांचे दर वाढलेले असताना त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.
मोबाईलचे नेटवर्क गायब होत असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. मोबाईल नेटवर्क कव्हरेज नसल्याने अनेक वेळा फोनच लागत नाहीत. लागलाय तर सुरू असलेला फोन मध्येच बंद होऊन संपर्क तुटण्याचे प्रकारही होत आहेत. त्याचप्रमाणे एकमेकांना संपर्क करू इच्छिणाऱ्या दोघांच्याही मोबाईल मध्ये नेटवर्क दाखवत असताना प्रत्यक्षात त्यांचा एकमेकांना फोन लागत नसल्याचाही काहींचा अनुभव आहे. मोबाईल केवळ फोन करण्यापूरताच मर्यादीत राहिला नाही .
सध्या मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही प्रंचड वाढली आहे. सद्या इंटरनेटच्या वापरातून करमणूकी बरोबर व्यवसाय व कार्यालयीन कामेही केली जात आहेत . इंटरनेट सेवेचा वेग कमी झाल्याने तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे . मोबाईल सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांनी त्यांचे दर फोर जी च्या नावाखालीअधिक प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसत आहे . इंटरनेट सेवा सुरुळीत चालण्याची अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत असताना सध्या निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.