लोहारा/प्रतिनिधी-लोहारा-माकणी रोडवर दत्तनगर पाटीजवळ कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.यात पाच बालकांचा समावेश आहे. हा अपघात दि.20 रोजी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान झाला.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, दि.20 रोजी दुपारी 2:30 ते 3:00 वाजेच्या सुमारास पुणे येथील एम एच 12 पी एच 6320 स्विफ्ट कार ने माकणीकडे जात असताना
एम एच 13 आर 1287 हा ट्रक लोहारा येथे येत असलेल्या ट्रकला रोडच्या बाजुला पडलेल्या खडकाचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहने समोरासमोर येऊन धडक बसली.यात कारमधील मनीषा नारायण साठे वय 32,नेताजी मनोहर मोरे वय 28,वैष्णवी नारायण साठे वय 12,वैभवी नारायण साठे वय 8, हे ठार झाले. तर सतीश पवार वय 35,नारायण हरिदास साठे वय 36,शितल सतीश पवार वय 30,संस्कृती सतीश पवार वय 6,वेदांत सतीश पवार वय 3, हरिष नारायण साठे वय 3 सर्व रा.माकणी ता.लोहारा हे गंभीर जखमी झाले असुन त्यातल्या त्यात तिघाची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले.दरम्यान मयताचे ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे शवविच्छेदन करण्यात आले.
कोरोना विषाणू रोगाने पुणे येथे थैमान घातले आहे.मयत सतीश पवार,जखमी नारायण साठे पुणे येथे कामानिमित्त राहत असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे मुळगावी माकणी येथे येत असतांना त्यांच्यावर काळाने घात केला.अपघाताची बातमी समजत माकणी गावात शोक पसरला.
