परंडा/ प्रतिनिधी -
परंडा येथिल एसबीआय बँकेतुन काढलेली निवृत्त सैनिकाची  4 लाखाची रोख रक्कम नजर ठेऊन असलेल्या चोरट्यांनी मोटार सायकलला लावलेली पैश्याची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.हि घटणा शुक्रवार दि.20 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परंडा येथे भर बाजार पेठीत घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सिरसाव ता. परंडा येथिल निवृत्त सैनिक हमीद पठाण यांचे दोन मुले आज देखील सैन्य दलात असाम आणी जम्मु मध्ये कार्यरत असुन सैनिक ईखलास पठाण याने आपल्या पगारीवर 5 लाखाचे कर्ज घेऊन बार्शी येथे घर जागा घेण्या साठी वडीलांच्या नावावर पैसे पाठवीले होते .
हमीद पठाण यांनी दि.20 रोजी मुलांने पाठविलेली 4 लाखाची  रक्कम  येथील  एसबीआय  बँकेतुन काढले व पीशावीत ठेऊन पिशवी मोटार सायकलच्या हुकाला लाऊन जुनी आडत लाईन मार्गाने निघाले रस्त्यावर गर्दी व वाहन असल्याने मोटार सायकल हळू चालवित असताना याचा गैर फायदा घेत नजर ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांनी पठाण यांची पैश्याची पिशवी काढून घेऊन पसार झाले असल्याचे पठाण यांच्या लक्षात येताच त्यांनी बँकेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता त्यांना फुटेज मध्ये काहीही निदर्शनास दिसून आले नाही.यामुळे पठाण यांनी परंडा पोलिसात फिर्याद दिली. मात्र रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. शहरातअ शा अनेक वेळा चोरीच्या घटना घडत असताना नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून.अशा रहदारीच्या व बँक ठिकाणच्या ठिकाणी संरक्षण म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.

 
Top