उस्मानाबाद /प्रतिनिधी-
पुणे येथे सजग नागरिक मंचाच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार सोहळा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात  उस्मानाबादेचे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा हरियाना सरकारचे प्रधान सचिव अशोक खेमका यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी  संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी आदींची उपस्थिती होती. पुरस्काराने सन्मानीत झाल्यानंतर सुभेदार यंाचे अभिनंदन होत आहे.

 
Top