
राज्य सरकार ने जाहीर केल्याप्रमाणे पाच दिवसाच्या आठवड्याला सोमवार दि.२ मार्च पासून प्रारंभ झाला. या पाच दिवसात कार्यालयीन कामकामाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.२५ पर्यंत ठेवल्यामुळे महिला कर्मचा-यांची चांगलीच धावपळ उडाली होती. विशेष म्हणजे सकाळी १० पर्यंत महसूल मधील वरिष्ठ अधिकारी ही कार्यालयात दाखल झाले नव्हते. त्यामुळे पाच दिवसाचा कामकाजाचा आठवडा यशस्वी होतो का ? याकडे सर्व सामान्याचे लक्ष लागले आहे.
आजपासून शासकीय कार्यालयीन कामकाजाचा पाच दिवसाचा आठवडा प्रारंभ झाल्याने प्रसारमाध्यमाच्या कांही प्रतिनिधींनी किती ऑफेस मध्ये अधिकारी-कर्मचारी वेळेचे पालन करतात, वेळेवपर कार्यालयात पोहचतात या संदर्भाचा आढावा घेतला. यावेळी महसूल विभागात अधिकारी व कर्मचारी ४५ टक्के उपस्थित असल्याचे दिसून आले. तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील अनेक कार्यालयात ७५ टक्के अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थिती नसल्याचे दिसून आले. शिक्षण विभागात ९५ टक्के अधिकारी-कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे महसूलचे वरिष्ठ अधिकारीच वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे अश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिला कर्मचा-यांची मात्र चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.घरचे कामकाज उरकूनच त्यांना कार्यालय गाठावे लागत असल्यामुळे महिलांची धावपळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.