तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील आरळी बु येथील जयश्री श्रीमंत सदाफुले (पौळ) यांनी "होम मिनिस्टर" या लोकप्रिय मालिकेतील आदेश बांदेकर  यांच्याकडून भेट म्हणून पैठणी मिळवत संपूर्ण कुटुंबासमवेत सहभागी होत मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले.
जयश्री सदाफुले या यांचे माहेर आरळी बु. असून उस्मानाबाद येथील दयानंद पौळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला,हल्ली त्या खोपोली मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहत असून कवी मनाचा जयश्रीताई विविध कला जोपासत आहेत, झी मराठी चॅनलवरील सुप्रसिद्ध मालिका कार्यक्रम "होम मिनिस्टर"च्या माध्यमातून निवेदक आदेश बांदेकर  यांच्याशी कौटुंबिक गप्पा व खेळ खेळाच्या माध्यमातून पैठणीची विशेष भेट स्वीकारता आली.यावेळी जयश्री यांनी आपल्या या यशस्वी जिवन  प्रवासात साथ देणारे मामा आरळी बु माजी सरपंच निवृत्त केंद्रप्रमुख चंद्रहार नारायणकर गुरुजीव मामी श्रीमती सागर नारायणकर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
या पूर्वी ही झी मराठी चॅनलवर आम्ही सारे खवय्ये या रेसिपी शोमध्ये  जयश्रीताईनी आपले कला कौशल्य सादर केले होते,तसेच विविध साहित्य संमेलन व काव्य संमेलनात सहभागी होत असतात, अनेक ग्रामीण आवड असणारे छंद जोपासत,आता जयश्री यांच्या पैठणी विजयामुळे तसेच झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कुटुंबाचे चित्रीकरण झाले.
यावेळी त्यांच्यासोत आई सुभद्राबाई सदाफुलें,पती दयानंद पौळ,मुलगा विश्वजीत, मुलगी पद्मजा, जाऊबाई डॉ.निता पौळ, डॉक्टर भाऊजी, सरस्वती चौगुले मावशी, मामेबहिणी अलका व्हटकर, सुलभा व्हटकर,प्रगती व्हटकर, सुनंदा नारायणकर, योग गुरु सईबाई, सारीका,मोहिनीताई व जीवलग मैत्रीणी यांच्यासह आरळी बु परिसरात आनंदाचे वातावरण असून शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे.
 
Top