घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर करोना चा संसर्ग होऊ नये म्हणून विविध उपाययोजना व त्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे व बांधकाम सभापती तथा गटनेता युवराज नळे यांच्यासोबत सर्वच पदाधिकारी व नगरसेवक आपापल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
सध्य परिस्थिती वर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हॅंड वाॅश स्टेशन्स, औषध फवारणी, किराणा, भाजी पाला, फळे,दुध, अत्यावश्यक मेडिकल औषधे इत्यादी वस्तूंची घरपोच व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले असून अजूनही आवश्यक त्या उपाययोजना नगरपालिका स्तरावरुन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दिवस कसोटी चे असल्याने व परिस्थिती बिकट असल्याने सर्व नागरिकांनी कुणीही बाहेर न येता घरातच थांबावे.आम्ही आपल्या सोबत सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
सर्व सुविधा घरपोच होणार असल्याने नागरिकांनी घरीच राहून या कठीण प्रसंगी प्रशासनाला सहकार्य आवाहन उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.