सर्व तहसीलदार व एसडीओ यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविंड 19)प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.त्या अन्वये जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोविंड 19) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे.त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.तथापि माझ्या असे निदर्शनास आले आहे की,उस्मानाबाद जिल्हयातील नागरिक बाहेर जिल्हयात प्रवास करीत आहेत.तसेच बाहेर जिल्हयातील नागरिकाही उस्मानाबाद जिल्हयात येत आहेत.बाहेर जिल्हयातून येणारे नागरिक,प्रवासी यांचे मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याकरिता जिल्हयातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या द्ष्टीने तात्काळ प्रतिबंधक उपायोजना करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी या कार्यालयाचे आदेश दिनांक-24 मार्च 2020 अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांची उपविभागाचे कार्यक्षेत्राकरिता व तालुका दंडाधिकारी यांची त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्राकरिता(Insident commander)म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व सुरळीतपणे पुरवठा होण्याकरिता उस्मानाबाद जिल्हयातील डिझेल/पेट्रोलपंप सकाळी 10.00ते दुपारी 04.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी चालु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात नेमणूक केलेले Insident commander उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार दिलेल्या आदेशाप्रमाणे डिझेल/पेट्रोलपंप चालु ठेवण्यात परवानगी देण्यात येत आहे.