उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा ( कोव्हीड-19 ) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च पासुन लागु केला आहे.त्यानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका,सर्व नगरपालिका शाळा व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी ,अनुदानित तसेच खाजगी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये हे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत यापूर्वीच निर्णय झाला होता.तर दि.16 मार्च रोजी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, तंत्रशास्त्र, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कुलगुरूंना व राज्यातील सर्व विभागांच्या संचालकांना तात्काळ शासन निर्णय काढुन राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, खासगी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे,तंत्रनिकेतने,अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, कला महाविद्यालये यांच्या दि.31 मार्च पर्यंत होणा-या सर्व परीक्षा व प्रात्यक्षिके पुढे ढकलण्यात येत असल्याचे माहिती देत दि.01 एप्रलि पासूनची परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील असे कळवले आहे. या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांनी देखील अंमलबजावणी बाबत परिपत्रक काढले आहे . तेंव्हा याची सर्व विद्यार्थी,पालक यांनी नोंद घ्यावी असे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी युवासेनेच्या माध्यमातुन दिलेल्या प्रसिसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.