उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना (COVID-19) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दि. 14 एप्रील .2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता बाजारपेठा बंद आहेत. या अत्यावश्यक सुविधांचा लाभ घेणे नागरीकांना सुलभ व्हावे. अत्यावश्यक परिस्थीतीत त्यांना घरा बाहेर-गावा बाहेर पडतांना, प्रवास करतांना संकोच- भिती निर्माण होउ नये. नागरीकांची मुलभुत- जिवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात. या हेतूने मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून पोलीस नियंत्रण कक्ष आणि प्रत्येक पोलीस ठाण्यास एक व्हॉटसॲप क्रमांक, दुरध्वनी क्रमांक, ईमेल उपलब्‍ध करुन देण्यात आला आहे. त्याकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक पाळीत एक अधिकारी- दोन कर्मचारी हजर राहणार आहेत. या क्रमांकाद्वारे नागरीकांना मदत, शंका, सवलत देण्याकामी वाहन पास तात्पुरत्या स्थितीत पुरीवीले जाणार आहेत.
ज्या अपरीहार्य कामासाठी घरा बाहेर पडण्याची- प्रवासाची सवलत आवश्यक आहे. तसेच ज्या मार्गाने बाहेर पडायचे आहे, प्रवास करायचा आहे त्या कारणांचा, मार्गांचा व सोबत प्रवास करणाऱ्या ईसमांचा सविस्तर उल्लेख करुन पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या 3 प्रमाणीत नमुन्यांत नागरीकांनी ऑनलाईन –प्रत्यक्ष संपर्क संबंधीत पोलीस ठाण्यात साधुन तसा परवाणा प्राप्त करुन घ्यायचा आहे.
सदर सुविधा फक्त अपरीहार्य- जिवनावश्यक गरजां कामी घरा बाहेर पडण्यासाठी उपलब्ध केली असल्याने फक्त निवडक प्रकरणांत अशी परवानगी तात्पुरत्या स्वरुपात, ठरवलेल्या वेळेत व ठरवलेल्या मार्गानेच प्रवास करण्याकरीता दिली जाईल. संदिग्ध, किरकोळ कामासाठी- प्रवासासाठी अशी सवलत- पास मंजुर केले जाणार नाहीत. याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जनतेस केले आहे.
 
Top