भूम‌/ प्रतिनिधी -
भूम  शहरातील जे कुटुंब  दररोज काम करून पोट भरतात, अशा लोकांचे मागील पाच सहा दिवसांपासून काय हाल  होत असतील, यांकड लक्ष देऊन अशा कुटुंबीयांना एक मदतीचा भाग म्हणून भूम पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, एपीआय गडवे  यांच्या मार्गर्शनाखाली व पत्रकार मार्फत तसेच शहरातील किराणा व्यापारी रियाज हन्नूरे व इच्छुक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने किराणा सामानाची विविध वस्तूंनी भरलेली एक बॅग देण्याची व्यवस्था केलेली आहे.
त्या बॅग मध्ये जवळपास सातशे ते आठशे रु किमतीचा किराणा, पीठ तांदूळ, तेल, मसाले, साबण, पेस्ट आदी किराणा देण्यात आला तसेच दिला जाणारा माल देत असताना साळवे हे प्रत्येकाला आपण या कोरोनाला थांबवायचे असेल तर एकच पर्याय आहे. आपण घराबाहेर पडू नका व इतरांना पडू देऊ नका आपला किराणा संपला तर आम्हाला मोबाईल फोन वर संपर्क करा आम्ही निश्चित आपली मदत करू परंतु सहकार्य करा असे आवाहन करीत आहेत.
तर ज्या दानशूर इच्छुक व्यक्तींना दान करावयाचे आहे अशा व्यक्तींनी माननीय एपीआय साळवे साहेब यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या लोकांना खरोखर उपासमारीची वेळ आली आहे व त्यांना किराणा ची आवश्यकता आहे त्यांनी भूम पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्यास कळवावे असे आवाहन  केले.
 
Top