भूम /प्रतिनिधी-
तालुक्यातील ज्या एकल महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना वा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मंजूर नाही. परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना वा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेस पात्र आहेत. अशा सर्व एकल महिलांना जाहिर आवाहन करण्यात येते की,  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या  आदेशानुसार प्रत्येक महिन्याचा 1 ला सोमवार राखीव ठेवण्यात आला आहे.
ज्या महिलांना विशेष सहाय्य योजनेच्या वरीलपैकी एकही लाभ मंजूर नसेल. आणि ज्या महिला शासन निर्णय क्र. 2018/प्रक्र.62/विसयो दि.20/08/2019 मधील तरतुदी नुसार पात्र असतील, अशा महिलांनी दर महिन्याच्या 1 ला सोमवारी तहसीलदार भूम यांचे कक्षामध्ये हजर राहून आपले संजय गांधी निराधार अनुदान योजना - श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना- इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे अर्ज सादर करावेत. अशा महिलांचे अर्ज त्याच दिवशी मंजूर करण्याची कारवाई करण्यात येईल.  सदरील मोहिमेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भूम तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या कडून करण्यात आले आहे.

 
Top