भूम/प्रतिनिधी-
जागतिक महिला दिनानिमित्त भूम शहरातील कर्तुत्ववान व आदर्श महिलांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सिनेअभिनेत्री धनश्री काडगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून भूम परिसरातील माता-भगिनींना या सोहळ्यातील 11 पैठणीची लकी ड्रॉ पद्धतीने योजना आयोजित केली आहे. यात भाग घेण्यासाठी तालुक्यातील महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन लेडीज क्लबच्या वतीने करण्यात आले आहे .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ. साळुंखे व्याख्यान आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री तुझ्यात जीव रंगला मालिका फेम धनश्री काडगावकर या उपस्थित राहणार आहे तसेच या कार्यक्रमांमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणा-या  कर्तृत्ववान आदर्श महिला श्रीमती जय कुंकूवार,  देवी शंकर ठाकूर, आदर्श शिक्षिका रशिदा बेगम अब्दुल सय्यद काझी, आदर्श परिचारिका  फुलबाई संतराम कोटंबे, आदर्श शेतकरी गृहिणी  आशा सोमनाथ माळी, आदर्श गृहिणी माता मुमताज हमजा पठाण, आदर्श उद्योजिका श्रीमती मीना विनायक उपरे,आदर्श माता यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आहे तरी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top