उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ. पद्मसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य, तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि. 02/03/2020 रोजी जि. प. प्राथमिक शाळा, कुंभारी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे सकाळी 10:00 ते 05:00 या वेळेत आयोजित केले होते. या आरोग्य शिबीराचा कुंभारी व परिसरातील सर्व वयोगटातील 590 महिला, पुरुष व बालकांनी याचा लाभ घेतला. यात प्रामुख्याने -हदयरोग, कान-नाक-घसा, नेत्र रोग, बालरोग, अस्थिरोग, यासह विविध आजारावर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरानी तपासणी व उपचार केले. व मोफत औघधाचा पुरवठा करण्यात आला.
या शिबीराचे उद्घाटन  जेष्ठ नागरिक श्री. दादाराव वडणे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता महावितरण लातूरचे श्री. राजाभाऊ वडणे, सरपंच अमिरोद्दीन पटेल, उपसरपंच पंडीत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष्य  बाळकृष्ण पाटील, चेअरमण विकास सोसायटी विष्णू वडणे, व्हा. चेअरमन निसार पटेल, जिल्हा सरचिटणीस भाजपा अल्पसंख्यांक सेल, उस्मानाबाद फारुक पटेल, कोषाध्यक्ष  सतीश तांबे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. झेड पटेल, ग्रा. प. सदस्य मानसिंग तांबे, जेष्ठ नागरीक सुक्राचार्य तांबे, भाऊराव वडणे, बाबू जमादार, प्रकाश वडणे, राहुल क्षिरसागर, नवनाथ वडणे, दादा इंगळे, अखिल म. काझी भोजने सर, इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 या शिबीरासाठी मुंबई येथील डॉक्टर्स डॉ. अजित निळे, डॉ. गौरव सिरसाट, डॉ. प्रग्या त्यागी, उपकेंद्राच्या आशांता दतात्रय तांबे, आकांशा पटेल, ढोरे-पाटील मॅडम, मिना कानडे,  यांनी रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे उत्तम शिंदे, सुजीत पाटील, अमीन सय्यद, संदिप खोचरे, रवि शिंदे यांनी परिश्रम घेतले.
 
Top