रुईभर /प्रतिनिधी-रुईभर ता.उस्मानाबाद येथील रहिवाशी बालाजी पोपट
पोद्दार (वय 35) यांचे शुक्रवारी (दि.14) रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील आयटीआय कॉलेज पाठीमागे सुमो गाडी चालवित असताना अपघाती निधन झाले.
    त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.15) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रुईभर येथे मोठया शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट,गावातील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने रुईभर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

 
Top