रुईभर /प्रतिनिधी- रुईभर ता.उस्मानाबाद येथील रहिवाशी अशोक माणिकराव पाटील (वय 65) यांचे दिर्घ आजाराने शनिवारी (दि.15)रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
    अशोकराव पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. तसेच त्यांनी रुईभर गावचे सरपंचपदही भुषविले होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.16) रोजी मोठया शोकाकुल वातावरणात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट,गावातील ग्रामस्थ यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे.
 
Top