
अपंग प्रमाणपत्राद्वारे जे बोगस लाभार्थी झाले आहेत, अशा बोगस लाभाथ्र्यांना शोधण्यासाठी जात पडताळणी प्रमाणे अपंग प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि.१७ फेब्रूवारी रोजी मंत्री कडू न्यायालयीन कामानिमित्त उस्मानाबाद शहरात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कडू म्हणाले की, न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरणे चालत आहेत. त्यामुळे कायद्यात सुधारणा होणे आवश्यक आहे, उस्मानाबाद मधील प्रकरणात आम्ही न्याय मागाला गेल्यानंतर आमच्यावर खटला दाखल केला तर संबंधीत कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यानी कायद्या मोडला आशांना मोकळे सोडले तर जे या प्रकरणी न्याय मांगत होते त्यांना ही यात गोवले गेले आहे. जिल्हा प्रशासन काम करीत नसल्यामुळेच न्यायालयावर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. उस्मानाबाद जिल्हयात विशेष भू-संपादन कार्यालयातील १० हजार शेतकरी मावेजा प्रकरणे न्यायालयात आहेत. मावेजा जाहीर केल्यापासून त्या रक्कमेस दोन टक्के व्याजाप्रमाणे शेतक-यांना रक्कम देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, आ. चौगुले, मयुर काकडे, निवासी उपजिलाधिकारी ख्ंादारे उपस्थित होते.
कामगार कार्यालयाची चौकशी करणार
यावेळी पत्रकारांनी कामगार कार्यालयात कामगार हिताच्या अनेक योजना आहेत. परंतू बोगस फाईली दाखल करून कांहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. या कार्यालयात दलालांचा सुळसूळाट असल्याचे ही मंत्री कडू यांना सांगितले. त्यावेळी मंत्री कडू यांनी संबंधित कार्यालयाची माहिती घेऊन कार्यवाही करणार असल्याचेही सांगितले.