उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 भूम तालुक्यातील तिंत्रज येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.१६ रोजी कारवाई करून एकास अटक केली.
यामध्ये आरोपी मारुती जानू पाचरणे (रा. तिंत्रज ता. भुम) हा तिंत्रज येथील हिम्मत धाब्यासमोर बेकायदेशीर पणे दारूविक्री करत असताना एलसीबी पथकाने कारवाई करून बॉबी संत्रा कंपनीच्या 43 बाटल्या व किंगफिशर बिअर कंपनीच्या 6 बाटल्या असा एकूण 3226 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करत त्याच ताब्यात घेतले. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस नाईक शिवाजी शेळके यांच्या फिर्यादीवरून अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top