तुळजापूर/प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी व्हावे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना स्वत:चे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. विक्रांत मोटे यांनी केले
 तुळजापूर शहरात पोलीस दलाच्या वतीने  ज्ञानसाधना स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयक  कार्यक्रमात डॉ.विक्रांत मोटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे उपस्थित होते. यावेळी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदे व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रा.मारुती अभिमान लोंढे , पोलीस उपनिरीक्षक रोटे यांनी ही विद्याथ्र्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस कर्मचारी श्री बालाजी जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी तुळजापूर व ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमासाठी अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 
Top