तुळजापूर/प्रतिनिधी-
कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी (मातोश्री, पत्नी, मुलगी) कुटूंबासोबत तिर्थक्षेत्र तुलजापूर मध्ये येवून आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीस अभिषेक पूजा करून साडी-चोळी अर्पण करून कुलधर्म कुलाचार केला.या पुजेचे पौराहित्य पवार परिवार के पारंपारिक पुजारी अप्पासाहेब पवार यांनी केले.
देवी दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीने  जनसंर्पक अधिकारी नागेश शितोळे व जयसिंग पाटील यांनी देवीची प्रतिमा देवुन आ. रोहीत पवार यांचा सत्कार केला. यावेळी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर जाधव, महेश जाधव, दुर्गश सांळुके, धनंजय पाटील, संदीप गंगणे, गणेश नन्नवरे, सचिन कदम,  मोहन भोसले, मयुर कदम आदीसोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top