तुळजापुर/प्रतिनिधी-
 तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री. महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने विविध सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रमास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
ही यात्रा दि.10 फेब्रुवारी पासुन सुरु होत आहे. दि.10 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता जि.प.प्राथमिक शाळा आयोजित भव्य सांस्कृतीक कार्यक्रम, दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री. महालक्ष्मी मुर्तीचे व पालखीचे पुजन करून गावातुन भव्य मिरवणुक काढून मंदिराकडे प्रस्थान होईल,   दिवसभर दर्शन, पुजन, नवस आदी कार्यक्रम व संध्याकाळी पोतराज व धनगर गीतांचा  जुगलबंदी कार्यक्रम, दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी  8 वाजता श्री. महालक्ष्मी मुर्तीचे व पालखीचे पुजन, दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्याचा मुकाबला, संध्याकाळी 8 वाजता जय तुळजाभवानी जागरण गोंधळ पार्टी कुरुल यांचा गोंधळ गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या यात्रेत परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे अवाहन देवसिंगा (तूळ)  ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top