उमरगा/प्रतिनिधी-
 शहरातील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व क्रक्रीडा भारतीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.9) रोजी तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या या  स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध गटातील  374 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विविध आठ गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली पासून ते पदवी  तसेच खुल्या गटात घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी मुलांच्या गटातून ऋषी वकारे (प्रथम), ओंकार बोडके (द्वितीय), श्रेयस पचंडे (तृतीय) तर मुलींमधून अदिती  चव्हाण (प्रथम), यशश्री माने (द्वितीय) तर प्राची भोसले व जानवी बिराजदार (तृतीय) यांनी यश संपादन केले. तसेच अन्य गटातून जानवी यादव, अर्पिता सूर्यवंशी, चव्हाण अंकिता, राहुल जमादार, लौकिक पतंगे, पृथ्वीराज वाघमारे,ओम राठोड,दत्ता बिराजदार , साई राठोड, अमृता मुगळे ,ऋतुजा बिराजदार ,समीक्षा बडूरे , अंकिता सूर्यवंशी , शेख मुस्कान जमादार पूजा , जमादार अश्विनी बिराजदार रुद्राक्ष,यशराज चाकुरे , मुरारी मुटले आणि प्राची भोसले या विद्याथ्र्यांनी यश संपादन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संघाचे तालुका संघचालक प्रा. राजाराम निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्यवाह रामदास  कुलकर्णी, तालुका सहकार्यवाह महेश पाटील, आनंद जाधव,  श्रीधर ढगे, गोपाळ आष्टे, संजीव कांबळे , प्रवीण मुगळे, अमर परळकर, प्रताप सिंग राठोड आदीनी  सहकार्य  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामदास कुलकर्णी यांनी केले.
 
Top