परंडा /प्रतिनिधी -
गटविकासअधिकारी रावसाहेब चकोर यांनी घेतली धरणे आंदोलनाची दखल -सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाचा पदभार सेवा जेष्ठ शिक्षक रघुनाथ दैन यांना देण्याबाबतचे काढले आदेश, सातव्या वेतन आयोगतील फरकाची जीपीएफ मध्ये जमा होणा-या बीलाची प्रत वैजिनाथ सावंत यांना न दिल्याने केंद्रीय मुख्याध्यापक महादेव गाडे व विस्तार अधिकारी मनोहर शेरे यांना नोटीस काढून खुलासा मागविण्या बाबत गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांना सुचवले, मासिक पगार दर महिन्याच्या 1 ते 5 तारखे पर्यंत होईल या दृष्टीने मुख्याध्यापक यांनी बीईओ ऑफिसला महिन्याच्या 22 तारखे पर्यंत पगार बीले जमा करण्याबाबत केंद्रीय  मुख्याध्यापक यांना लेखी काढण्याची केली सुचना,तसेच वैद्यकीय बीले व कर्तव्य कालावधीतील पुरवणी बीले जानेवारी 2020 च्या पगारा सोबतच अदा करण्याचे सांगितले, तिमाही बजेट मागणी दर तीन महिन्याला करून पुरवणी बीले व वैद्यकीय बीले प्रलंबित राहणार नाहीत याबाबत गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांना खडे बोल सुनावले.धरणे आंदोलनाचे वेळी पंचायत समिती सदस्य नामदेव भाग्यवंत यांनी भेट देऊन आस्थेने विचारपूस करून आपल्या मागण्याबाबत आम्ही आग्रही आहोत असे सांगितले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,तालुका अध्यक्ष परंडा विनोद सुरवसे,लक्ष्मण औताडे,दत्तात्रय वाघमोडे,महिला अध्यक्षा श्रीम.ज्योती देशमुख,विजय जरांडे, रमेश शिवणकर,घनश्याम भोई,भैरवनाथ शिरगिरे,सिद्धेश्वर मेदने,बाळासाहेब हजारे,नागनाथ नरूटे पाटील प्रहार जन शक्ती पक्ष परंडा तालुका अध्यक्ष  आदि पदाधिकारी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top