तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील केशगाव येथील शिनगारे कुंटुबियांनी घराचा छतावर अश्वरुड छञपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारुण माता-पित्याची इच्छापुर्ती केली. पुतळयाचे अनावरण रविवार दि.2 रोजी खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहावे,असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद दादा डोंगरे , अझर मुजावर , विजय गायकवाड , कृष्णा रोचकरी ,  बप्पा रोचकरी ,पञकार  दिनेश सलगरे सह केशेगाव येथील आजी- माजी सरपंच, उपसरपंच ,  शिवभक्त , ग्रामस्थ मोठ्या संख््येने उपस्थित होते.
 
Top