तुळजापूर/प्रतिनिधी -
रथसप्तमीनिमित्त शनिवारी (दि. 1) तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली होती. सायंकाळीच्या अभिषेक पूजेपर्यंत हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे रथात स्वार रूपाचे दर्शन घेतले. या वेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, रथसप्तमीनंतर महिलांचा हळदी कुंकूवाचे कार्यक्रम थांबणार आहेत.
सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र, अलंकार घालण्यात येऊन धुपारतीनंतर अंगारा काढण्यात आला. यावेळी रथसप्तमीनिमित्त तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. सायंकाळच्या अभिषेक पुजेपर्यंत रथात स्वार तुळजाभवानी मातेच्या रूपाचे दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. तत्पूर्वी पहाटे 4.30 च्या सुमारास चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 6 वाजता अभिषेक पुजेस प्रारंभ करण्यात आला.दरम्यान, मकर संक्रांतीपासून मोठ्या उत्सुकतेत सुरू असलेल्या महिलांच्या हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमांना रथसप्तमी नंतर ब्रेक लागणार आहे.
 
Top