निवडणुकीच्या कामामुळे शाळेतील अध्यापन पध्दतीवर परिणाम होत आहे.निवडणुकीत बिएलओ कामाची सक्ती करता येणार नाही तसेच कार्यवाही करू नये असे कोर्टाने निर्देश दिलेले असतानाही प्रशासकीय यंत्रणा जबरदरस्तीने लोकप्रतिनिधी कायद्याचा धाक दाखवत आहे. या जोखडातून मुक्त करण्यासाठी आम्हाला शिकवू द्या अशी मागणी करत शिक्षकांनी आंदोलन केले. यावेळी आपल्या मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यामंत्र्यांना दिले आहे.
यावेळी राज्य संघटक प्रदीप मदने, राज्य नेते सुरेश वाघमोडे, बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे, बाळासाहेब वाघमारे, शेषेराव चव्हाण, शिवाजी कवाळे, रमेश बारसकर, मेघराज मोटे, सुधीर येणेगुरे, सविता पांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षकांनी आंदोलनात भाग घेतला होता.