
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 6 व्या शतकातील उत्तरेश्वर मंदीरामध्ये असलेल्या पुरातन सुर्यनारायणाच्या मुर्तीच्या दर्शनासाठी रथसप्तमीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील उत्तरेश्वर मंदीरात श्री.सुर्यनारायणाची पुरातन मुर्ती असून सात घोडयाच्या रथावर सुर्यनारायण उभारलेले असून सुर्यनारायणाच्या दोन्ही पत्नी लक्ष्मी व छाया दोन्ही बाजूला उभ्या आहे. मुर्तीच्या पाठीमागे सुर्याची प्रभावळ असून मुर्तीवर उत्कष्ट प्रकारची कलाकुसर केलेली आहे. रथसप्तमीनिमीत्त सुर्यनारायणाच्या मुर्तीची महापूजा विजयकुमार लाड व प्रशांत वाघ यांच्या हस्ते करण्यात आली. राज्यात रथावर उभी असलेली 6 व्या शतकातील विविध कलाकुसरीची एकमेव मुर्ती असल्याने रथसप्तमी दिवसी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.