उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रमदान व तांत्रिक श्रमदान शिबिराचा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी समारोप करण्यात आला.
अध्यक्षस्थानी भालचंद्र हुच्चे होते. हे शिबिर दि.3 ते 9 फेबु्रवारी  या कालावधीत घेण्यात आले. या शिबिरात एकूण 75 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. समारोप कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अप्पर कोषागार अधिकारी  एम. एस. साखरे, अप्पर कोषागार अधिकारी सी.एस. काजळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  रविशंकर साबळे, प्राचार्य श्री. एस.व्ही सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.जी. जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम. जी. महाडिक यांनी केले.
तसेच कार्यक्रम अधिकारी बी.बी. जाधव, श्री. के.डी.नाईक,  एस.टी राऊत,  जी.एम.कोरे, श्री.कोरे, अे.डी.सुरवसे, निर्देशक श्री.एस.ए.शेख यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता परिश्रम घेतले. गटनिर्देशक श्री.बी.एच.भोसले यांनी आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने शिबिराचा समारोप संपन्न झाला.

 
Top