उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 स्वामी समर्थ मूकबधीर शाळेतील विशेष शिक्षक भगवान धर्मांण्णा चौगुले यांना मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य महेश लांडगे यांच्या हस्ते भारत गौरव प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वल्र्ड सेव्हन वन्डर्स संस्थेच्या 13 व्या अखिल भारतीय प्रतिमा संमेलन, पुणे येथील कार्यक्रमात आझाद हिंद सेनेनी राधाकृष्ण शास्त्री, पद्मश्री डॉ. सुदाम काटे पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री.चौगुले यांनी दिव्यांग विद्याथ्र्यांमध्ये विविध उपक्रम, साहित्य लेखन, जनजागृती केली,त्यांच्या या कार्याची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.  या यशाबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, सहाय्यक सल्लागार श्रीमती साधना कांबळे, सुभाष शिंदे, संस्था सचिव श्रीमती लक्ष्मीबाई इटकर, श्री.निवास इटकर, बालाजी लोमटे, शहाजी चव्हाण, बालाजी नादरग, शकील शेख, श्री.एम.जी. गायकवाड,श्री. संजयकुमार इटकर,श्री.बलभीम साळुंखे यांनी अभिनंदन केले.

 
Top