तुळजापूर/प्रतिनिधी-
आपसिंगा येथील महादेव मंदीरात सापडलेले दीड तोळे सोन्याचे गंठण दिंगबर महादेव क्षिरसागर यानी   परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वञ कौतुक होत आहे.
कामठा येथील वैशाली बालाजी जमदाडे या आपसिंगा येथील महादेव मंदीरात दर्शनार्थ गेल्या होत्या. त्यावेळी  त्यांच्या गळयातील  दीड तोळा  सोन्याचे गंठण हरवले होते.  हे हरवलेले गंठण आपसिंगा येथील दिंगबर महावीर क्षिरसागर यांना सापडले त्यांनी या संदर्भात बीट अमलदार राठोड माहिती दिली. त्यानंतर  सोन्याचे गंठण हरावलेल्या कामठा येथील  वैशाली जमदाडे यांना शोधुन पो.नि. हर्षवर्धन गवळींचा उपस्थितीत देण्यात आले.

 
Top