तुळजापूर/प्रतिनिधी-
तिर्थक्षेत्र तुळजापूर प्रवेशद्वारावरील सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ८५ विद्युत दिवे दोन महिन्यानपासून बंद असल्याने येथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील परिसरात चो-याचे व दुर्घटनाचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरीत लक्ष देऊन या राष्ट्रीय माहामार्गावरील पथदिवे बसविण्याची मागणी वाहन चालकामधुन होत आहे.
सोलापूर-धुळे महामार्गवरील सिंदफळ ते तिर्थक्षेञ तुळजापूर प्रवेशद्वारावरील महामार्गावर विद्युत दिवे बंद असल्याने येथे रात्री अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. याचा  फायदा घेत चोरांनी तीन दुकाने फोडली आहेत. तसेच अंधारामुळे वाहन चालकांना वाहन चालविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच किरकोळ दुर्घटना ही घडत आहेत, त्यामुळे वाहन चालकांना रात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधित जिम्मेदार अधिका-यांनी ध्यान देऊन वाहनचालाकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

 
Top