परांडा/ प्रतिनिधी-
वास्तव व प्रामाणिकपणा वर आधारित ग्रामीण भागाच्या समस्या मांडण्यासाठी म्होरक्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे, प्रतिपादन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिव यांनी केले.
शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात म्होरक्या चित्रपटाच्या संबंधित विद्याथ्र्याना दि.3 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर म्होरक्या या सिनेमातील दिग्दर्शक अमर देवकर लिखित या सिनेमामध्ये काम करणारे कलाकार आकाश बनसोडे, भूषण देवकर, रुपेश बनसोडे, समाधान नन्नवरे,अनिकेत गाडे व अभिजित शेरखाने इत्यादी कलाकार उपस्थित होते. या चित्रपटाचे सादरीकरण सात फेब्रुवारी रोजी होणार असून त्यासंदर्भात विद्याथ्र्यांना माहिती देण्यासाठी ही सर्व टीम महाविद्यालयांमध्ये दाखल झाली होती.
यावेळी महाविद्यालयातील प्रा.विद्याधर नलवडे ,प्रा निखिल आडसुळे, प्रा.डॉ.सचिन चव्हाण उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी कनिष्ठ-वरिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठया संख्याने उपस्थित होते. यावेळी म्होरक्या या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांना दाखविण्यात आला.
 
Top