उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात वाळु साठ्यांचे लिलाव अध्याप झालेले नाहीत. तरी देखिल जिल्ह्यात वाळु माफीया जोरदार कार्यरत आहे. त्यातच उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामसेवक असलेले गिरीधर एडके यांनी झरेगाव हद्दीत भोगावती नदीतील अंदाजीत एक कोटी रुपयांच्या वाळूची चोरी करुन शेतात साठा केले आहे. याबाबत महसुल प्रशासनाला माहिती मिळताच चिलवडीच्या तलाठी श्रीमती निंबाळकर आणि मंडलाधिकारी टोणे यांनी मॅनेज होत पंचनामा केला मात्र वाळू सिल करण्यात आली नाही. त्यामुळे वाळुसाठा नष्ठ करुन ग्रामसेवकाला वाचवण्याचे काम महसुल प्रशासन करत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यातुन वाहणा-या सिना, कळंब तालुक्यातुन वाहणा-या मांजरा तर उस्मानाबाद-लोहा-यातुन वाहणा-या तेरणा नदीतील वाळुलचे लिलाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने केले जातात.मात्र उस्मानाबाद शहरातुन राघुचीवाडी, चिलवडी, झरेगाव मार्गे जाणा-या भोगावती नदीत देखिल मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा आहे. मात्र याकडे मात्र महसुल विभागाने दुर्लक्ष केले आहे.

 
Top