उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हातील सर्व जिल्हा परिषद, संस्था, खाजगी शाळेमध्ये शिक्षक सोशल मीडिया वापर शाळेच्या वेळेत टाईमपास म्हणून करतात तसेच शाळेमध्ये शिक्षक विद्याथ्र्यां समोर धुम्रपान करतात. समाज घडविण्याचे काम शिक्षकांवर असते, परंतू तसे होताना दिसत नाही,  सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे शिक्षकांचे विद्याथ्र्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्या मुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, या सर्व बाबींकडे लक्ष देऊन शाळेच्या वेळेत जिल्हयातील सर्व शाळेमध्ये मोबाईल, धुम्रपानावर बंदी घालण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी आपल्या मांगणीचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोमवार ३ फ्रेबुवारी रोजी देण्यात आले.
आता प्रत्यक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये जावून शिक्षकांची झडती घेतली जाणार आहे. यावेळी शिक्षकांकडे जर शाळेच्या वेळेत मोबाईल दिसल्यास तो जप्त करून जिल्हाधिका-यांकडे जमा करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी  मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, उपजिल्हा अध्यक्ष हेमंत पाठक,विद्यार्थी सेनेचे कुणाल महाजन,निलेश जाधव,अक्षय हाजगुडे ,धिरज खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top