तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे सर्वधर्मीय भक्त मोठया संख्येने आहेत. हिंदु भाविकांप्रमाणेच आई तुळजाभवानी देवीचा कुलधर्म कुलाचार इस्लाम धर्मातील मुस्लिम भाविक ही करतात. अमीर चांद सय्यद या मुस्लिम भाविकाने आपल्या संपुर्ण परिवारासोबत श्री तुळजाभवानी मातेस श्रीखंडाची सिंहासन पुजा करून देवीच्या वारा दिवशी देवीभक्तांना महाप्रसादाचे वितरण केले. याचे पौराहित्य पुजारी रामभाऊ छत्रे यांनी केली.
 तिर्थक्षेञ श्री तुळजाभवानी मातेच्या दारी सर्व जाती-धर्माला तसेच ईस्लाम धर्मातील मुस्लिम नागरिकांना मान असुन  देवीला पानाचा विडा हा दररोज मुस्लिम भाविकांकडून दिला जातो. देवीच्या मंचकि निद्रेसाठी जी गादी तयार करतात त्याचा कापुस पिंजुन देण्याचा मान येथील मुस्लीम समाजाकडे आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर हे ख-या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे.

 
Top