उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयातील 12 वीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (दि.12) विद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. विद्याथ्र्यांनी वर्षभरात आलेले अनुभव व शिक्षकांचे योगदान याबद्दल भाषणातून माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच नानासाहेब मगर,  विनोद बाकले, ग्रामपंचायत सदस्य सुधीर मगर, माजी उपसरपंच सतिष खडके, संजय खडके, मुकुंद पाटील, मुकुंद शेळके, पोलीस पाटील नबीसाहेब तांबोळी, मुख्याध्यापक जी. व्ही. शिराळ, एस. के. डोके, श्री. वाकडे, के. एस. पटाडे आदींसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तम्मना शेख, मेघा कुंभार तर आभार श्री. लाड यांनी मानले.

 
Top