उस्मानाबाद/प्रतिनिधी-
१५० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली २६.५ एकर जागा त्वरीत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन  मुंबईचे संचालक डॉ.तात्याराव लहाने यंानी दिले आहेत.
२१ ऑक्टोबर २०११ रोजी तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या दृष्टीकोनातून प्राथमिक तपासणी करण्यासाठी तज्ञ समितीचे गठण करण्यात आले होते. सदर समितीने १६ सप्टेंबर २०१९ रोजी प्राथमिक अहवाल पुढील मान्यते करीता सादर केला आहे.
आ.ठाकूर व आ.पाटील यांनी केली होती मागणी
भाजपा सरकारच्या काळात भाजपाचे सरचिटणीस व आ.सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबादेत झालेल्या महाआरोग्य शिबीरामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे उस्मानाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालु करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विधान परिषदे मध्ये मराठवाडयातील विद्याथ्र्यांवर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाबाबत कशा प्रकारे अन्याय होतो, हे प्रभावीपणे मांडले होते. त्यानंतर महाविद्याल चालु करण्यासंदर्भात गतीने हलचालीं सुरू झाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात पाठपुरावा कमी पडू लागला. शिवसेनेचे आ. कैलास घाडगे-पाटील यांनी याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे किती गरजेचे आहे, हे सांगितले. त्यानंतर मंत्री देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाणे यांना जागेसंदर्भात जिल्हाधिका-यांना आदेश दिले.
 
Top