तुळजापूर/प्रतिनिधी-
महाविकास आघाडी सरकार मध्ये समन्वय नाही,  समन्वयाचा आभाव असल्याने  हे सत्तेत आहेत तो पर्यत  समन्वय राहु दे असे साकडे आपण देविला घातले आहे, असे संागून हिम्मत असेल तर निवडणूक घेवुन एकटे - एकटे लढा, अशा प्रकारचे आवाहन शिवसेनेचे नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
बुधवारी दि.१२ रोजी चंद्रकांत पाटील यांनी देवीदर्शन घेतले. त्यानंतर पञकारांशी बोलताना ते म्हणाले की, श्री तुळजाभवानी  आमच्या घराण्याची कुलदैवत आहे, दरवर्षी नित्यनियमाने आम्ही देवी दर्शनार्थ येतो. आज देविला आम्ही हे सरकार पडू दे असे साकडे घातले नाहीतर  महाविकास आघाडीच्या या सरकार मध्ये समन्वय राहु दे अशा प्रकारचे साकडे घालून शेतक-यांचे, जनतेच्या भल्याचे निर्णय घेण्यास यांना सद्बुध्दी दे, अशी प्रार्थना केली आहे.  हे सरकार जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देत आहे, परंतू नव्या योजना जाहीर करीत नाही, फक्त स्थगिती देण्याचे काम करीत आहे, या सरकारचे मंञी एकाच विषयावर वेगवेगळे बोलतात, त्यामुळे यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येते.  या सरकार ने केलेली कर्जमाफी फसवी आहे तसेच  मराठवाडयातील पाणीप्रश्न मिटण्यासाठी मराठवाडा वाँटर ग्रीडला यांनी स्थगिति दिल्याचा आरोप ही त्यंानी केला.
यावेळी श्री तुळजाभवानी संस्थान तर्फे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील,  धार्मिक व्यवस्थापक सिध्देंश्वर इंतुले, नागेश शितोळे, आ. सुजितसिंह ठाकुर,  जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, जि.प.अध्यक्ष अस्मिता कांबळे , माजी दत्ता कुलकर्णी, देवानंद रोचकरी, उपनगराध्यक्ष बापुसाहेब कणे, सुधीर पाटील, नगरसेवक सचिन पाटील,  विनोद गंगणे, विजय शिंगाडे, नारायण नन्नवरे,  माजी पंचायत समिती सभापती संतोष बोबडे, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, जि.प.सदस्य राजकुमार पाटील, विक्रमसिंह देशमुख,  विशाल रोचकरी, गणेश रोचकरी, सागर कदम, विकास मलबा, प्रसाद पानपुढे, मकरंद लबडे, सुहास सांळुके, गणेश रोचकरी, सागर पारडे  सह भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top