उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सामाजिक वनीकरण विभाग, उस्मानाबाद यांनी कृषी महाविद्यालय किणी येथे आनंद घनवन योजनेंतर्गत 18 हजार रोपांची लागवड केली आहे. येथील क्षेत्राची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ.अशोक धवण, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश आहिरे यांनी पाहणी केली. यावेळी वृक्ष लागवडीबद्दल आणि विविध वृक्षांची वाढ अतिशय उत्तम होत असताना पाहून तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांच्या परस्पर सहकार्यातून वनीकरणाचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे आकारास येत आहे, भविष्यात हा परिसर वृक्षांनी नटलेला पाहून निश्चित समाधान वाटेल आणि येथे विविध पक्ष्यांचे वास्तव्य वाढीस लागेल, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण श्री. बेडके, वनक्षेत्रपाल टी. एस.गांधले, श्री.पी.व्ही.कावळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.