तेर/ प्रतिनिधी-
तेर (ता.उस्मानाबाद) येथील शिव नृसिंह ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून राज्यात प्रथम व देशात ६ वां क्रमांक पटकाविणारी महाराष्ट्र संत विद्यालयाची खेळाडू राधा गोरोबा गोरे  हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हरी भक्त पारायण शिवचरित्रकार गौरीताई सांगळे, संयोजनी  निंबाळकर, हरी खोटे, अविनाश इंगळे, अक्षय कोळपे ,वैभव वैरागकर, सुधाकर बुकन आदिंसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

 
Top